विकेंडला ‘यूएनओ’ची धूम : इनऑर्बिट मॉल्समध्ये रंगणार रंगतदार चॅम्पियनशिप
इनऑर्बिट वाशी मॉलमध्ये ८ ते १० मे २०२६ रोजी UNO एलिमिनेशन टूर्नामेंट होणार. ₹५०,००० पर्यंत बक्षिसे आणि Mattel उत्पादने खरेदी करून सहभागी व्हा.
मुंबई : विकेंड आता अधिक रंगतदार होणार आहे. इनऑर्बिट मॉल्सने मॅटेलच्या सहकार्याने आणि क्रॉनिकल्सच्या आयोजनातून ‘यूएनओ चॅम्पियनशिप’ स्पर्धा जाहीर केली आहे. नॉस्टॅल्जिया आणि थरार यांचा मिलाफ असलेली ही स्पर्धा शहरातील खेळप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
वाशी येथील इनऑर्बिट मॉलमध्ये 8 ते 10 मे दरम्यान, तर मालाड येथील इनऑर्बिट मॉलमध्ये 5 ते 7 जून दरम्यान ही चॅम्पियनशिप रंगणार आहे.
शुक्रवार आणि शनिवारी मॉलमध्ये शेकडो स्पर्धक एकाच वेळी ‘यूएनओ’च्या वेगवान फेऱ्यांमध्ये सहभागी होतील. टेबलांवर हास्य, उत्सुकता आणि शेवटच्या पत्त्याचा थरार अनुभवायला मिळेल. रविवारी ‘ग्रँड फिनाले’मध्ये अव्वल स्पर्धक आमने-सामने येतील. तिथे स्पर्धा अधिक तीव्र आणि उत्साह शिगेला पोहोचलेला असेल.