आशिष विद्यार्थी यांचा पहिला रॅप सॉंग 'तानाशाही' ठरला सुपरहिट
मुंबई: खलनायक, चरित्र अभिनेता आणि आता गायक! भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या कलेची नवी दिशा शोधली आहे. खलनायकाच्या दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांना भारावून टाकणाऱ्या आशिष यांनी आता संगीतविश्वात पाऊल ठेवले आहे. त्यांच्या पहिल्याच रॅप सॉंग 'तानाशाही' ने संगीत क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.हा गाणं त्यांच्या यूट्यूब चॅनल 'आशिष विद्यार्थी अॅक्टर व्लॉग्स' वर रिलीज करण्यात आलं...
मुंबई: खलनायक, चरित्र अभिनेता आणि आता गायक! भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या कलेची नवी दिशा शोधली आहे. खलनायकाच्या दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांना भारावून टाकणाऱ्या आशिष यांनी आता संगीतविश्वात पाऊल ठेवले आहे. त्यांच्या पहिल्याच रॅप सॉंग 'तानाशाही' ने संगीत क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
हा गाणं त्यांच्या यूट्यूब चॅनल 'आशिष विद्यार्थी अॅक्टर व्लॉग्स' वर रिलीज करण्यात आलं आहे. त्यांची तीच दमदार आणि ताकदवान आवाज, जो पूर्वी प्रेक्षकांना घाबरवत असे, आता श्रोत्यांना झुलवत आहे. माइक हातात धरून गाण्याच्या जगात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थी यांनी 'तानाशाही' मधून प्रेक्षकांना प्रेरणादायक संदेश दिला आहे.
या रॅपचं संगीत उभरत्या संगीतकार जोडी मॅक-मल्लार यांनी तयार केलं आहे. मल्लार करमाकर यांनी आशिष विद्यार्थी यांच्यासोबत स्वतःचा आवाज दिला आहे, ज्यामुळे गाण्याची ताकद अधिकच वाढली आहे.