एलॉन मस्क याम्ना देखील करायची आहे दुनिया मुठ्ठी में! बनवणार स्मार्टफोन

महत्वाची बात म्हणजे मस्क ट्विटर सब्सस्क्रिप्शन प्लॅन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. ते युजर्सना ८ डॉलर शुल्क आकारण्याची योजना तयार करत आहेत.

Dec 1, 2022 - 22:02
 0
एलॉन मस्क याम्ना देखील करायची आहे दुनिया मुठ्ठी में! बनवणार स्मार्टफोन
एलॉन मस्क याम्ना देखील करायची आहे दुनिया मुठ्ठी में! बनवणार स्मार्टफोन

जर गुगल किंवा अॅपलने आपल्या अॅप स्टोअरवरून ट्विटर बॅन केले तर मस्क बाजारात नवा स्मार्टफोन आणणार का? असा प्रश्न एक अयुजरने विचारल्यावर यावर मस्क म्हणाले, मला खात्री आहे की, असे होणार नाही, मात्र जर असे झालेत कर मी नवीन स्मार्टफोन तयार नक्की करेल. एलॉन मस्क यांनी ट्विटरवर आपला ताबा मिळवला, नवीन मालक होताच त्यांनी ट्विटरमध्ये अनेक उलथा-पालथ केली. यानंतर आता मस्क यांनी थेट स्मार्टफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपल आणि गुगल यांना थेट इशारा दिला आहे.

त्यामुळे मस्क आता पुढे कोणते पाऊलं उचलता याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. या दोन्ही कंपन्यांनी ट्विटरवर बंदी घातल्यास आपण स्वतः स्मार्टफोन तयार करू, असे म्हणत या दोन्ही कंपन्यांना मस्क यांनी थेट इशाराच दिला आहे. अर्थात या कंपन्यांनी आपल्या प्ले स्टोअरवरून ट्विटरवर अॅप बॅन केल्यास मस्क असा निर्णय घेऊ शकतात. 

महत्वाची बात म्हणजे मस्क ट्विटर सब्सस्क्रिप्शन प्लॅन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. ते युजर्सना ८ डॉलर शुल्क आकारण्याची योजना तयार करत आहेत. यामुळे ट्विटरचा रेव्हेन्यू वाढण्यास मदत होईल. इतकेच नाही तर ट्विटरच्या पेड सब्सस्क्रिप्शन प्लॅनचा अॅपल आणि गुगललाही फायदा होणार आहे. अॅपल आणि गुगल हे आपल्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्या गेलेल्या सब्सक्रिप्शनवर कमीशन घेत असून दोघेही डेव्हलपर्सकडून 15 टक्के घेतात. ही किंमत 30 टक्क्यांवरून आता 15 टक्के करण्यात आली आहे. अॅपल आणि गुगल अशा प्रकारे चार्ज करत असल्यावरून मस्क यांनी नेहमीच त्यांच्यावर टीका केली आहे. 

कंटेन्ट मॉडरेशन इश्यूच्या मुद्द्यावर अॅपल आणि गुगल अॅप स्टोअरवर ट्विटर बॅन केले जाऊ शकते. एलॉन मस्क यांची कंपनी असलेल्या ट्विटरने अॅपल आणि गुगलच्या दिशानिर्देशांचे पालन केले नाही, तर अॅप स्टोअरवरून ट्विटर बॅन केले जाण्याची शक्यता आहे.