इनऑर्बिट मॉल वाशीचा इनऑर्बिटनाईटआउट महोत्सव

60 हून अधिक ब्रँड्सवर ५०% पर्यंत सूट, खरेदीच्या उत्साहात आणखी भर घालण्यासाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम
नवी मुंबई : इनऑर्बिट मॉल वाशी ४ ते ६ जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० ते मध्यरात्री या कालावधीत तीन दिवस चालणाऱ्या इनऑर्बिटनाईटआउटच्या दुसऱ्या आवृत्तीसह रात्रीचा आनंद देण्यासाठी सज्ज होत आहे. या वाढलेल्या वेळेत 60 हून अधिक ब्रँड्सवर ५०% पर्यंत सूट मिळून असंख्य शॉपिंग डील तर मिळतीलच, शिवाय आणि सोबतच विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही पाहायला मिळतील.
४ जुलै रोजी द धारावी ड्रीम प्रोजेक्ट, डेसिबल आणि बॉम्बे लोकल या डायनॅमिक हिप हॉप शोकेससह याची सुरुवात होईल; स्ट्रीट कल्चर, लिरिक खेळाआणि बीट्स थेट नवी मुंबईच्या हृदयात आणतील. ५ जुलै रोजी, आकाश दुबे यांच्या लाईव्ह बँड सादरीकरणाने रात्रीला सुर आणि लय भरतील. ६ जुलै रोजी होणारा शेवटचा कार्यक्रम आकर्षक आंतरराष्ट्रीय व्हायोलिन सादरीकरणाने अनुभव उंचावतो, जो शास्त्रीय लयीला आधुनिक अभिजाततेशी जोडतो.
इनॉर्बिट मॉल वाशी येथे इनॉर्बिटनाईटआउट हा केवळ एक शॉपिंग इव्हेंट नाही; तो रात्रीच्या आकाशाखाली लय, शैली आणि उत्साही समुदाय भावनेचा उत्सव आहे.