म‍िस युनिव्हर्स इंड‍िया 2025 – मनिका विश्वकर्मा यांचा प्रेरणादायक प्रवास

मनिका विश्वकर्मा कशा बनल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2025? जाणून घ्या त्यांच्या यशामागचा निर्णायक क्षण.

Aug 22, 2025 - 21:50
 0
म‍िस युनिव्हर्स इंड‍िया 2025 – मनिका विश्वकर्मा यांचा प्रेरणादायक प्रवास
म‍िस युनिव्हर्स इंड‍िया 2025 – मनिका विश्वकर्मा यांचा प्रेरणादायक प्रवास

अलीकडे पार पडलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धेत मनिका विश्वकर्मा यांनी विजेतेपद पटकावले आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील रहिवासी असलेल्या मनिका आता भारताचं प्रतिनिधित्व 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत करणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, कोणत्या एका प्रश्नाच्या उत्तरामुळे त्या विजेते ठरल्या?

या स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र, मनिका विश्वकर्मा यांनी सर्वांना मागे टाकत ताज आपल्या नावावर केला. त्या सध्या दिल्लीमध्ये मॉडेलिंग करतात आणि शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, 2024 मध्ये त्यांना मिस युनिव्हर्स राजस्थानचा किताबही मिळाला होता.

फायनल राऊंडमधील निर्णायक प्रश्न

फायनल राऊंडमध्ये मनिकाला विचारण्यात आले – “जर तुम्हाला महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देणे या दोघांपैकी एक गोष्ट निवडावी लागली, तर तुम्ही काय निवडाल?”

यावर उत्तर देताना मनिका म्हणाल्या –
“महिलांना अनेक वर्षांपासून शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं आहे. त्यामुळेच आपली अर्धी लोकसंख्या अजूनही शिक्षणापासून दूर आहे. याचं थेट परिणाम म्हणजे अनेक कुटुंबं अजूनही गरिबीत आहेत. त्यामुळे जर मला संधी मिळाली, तर मी महिलांच्या शिक्षणाला माझी प्राथमिकता ठरवेन. हे फक्त एका व्यक्तीचं आयुष्य बदलणार नाही, तर देशाच्या आणि जगाच्या भविष्यासाठीही एक क्रांतिकारी पाऊल ठरेल. जरी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या, तरी दीर्घकालीन प्रभाव देणारी कृती अधिक गरजेची आहे.”

मनिका विश्वकर्मा – शिक्षण आणि स्वप्नांचा समतोल

राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील रहिवासी असलेल्या मनिका सध्या दिल्लीमध्ये राहून शिक्षण घेत आहेत आणि स्पर्धांची तयारीही करत आहेत. त्या सध्या पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या विषयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. शिक्षण आणि सौंदर्य स्पर्धा यामध्ये त्यांनी सुंदर समतोल साधलेला आहे.

मिस युनिव्हर्स इंडिया बनण्यासाठी काय आवश्यक?

या स्पर्धेसाठी तयार होणाऱ्या तरुणींनी स्वतःवर विश्वास ठेवणं, फिटनेस आणि हेल्थवर लक्ष देणं, कम्युनिकेशन स्किल्स आणि पब्लिक स्पीकिंगमध्ये प्रावीण्य मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय पर्सनॅलिटी, स्टाईल आणि ग्रूमिंग, तसेच सोशल आणि करंट अफेअर्स याबाबत माहिती असणं फायद्याचं ठरतं. लहान स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनुभव मिळवावा आणि नियमित सराव करत राहावा. हे सगळे पैलू मिळून तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि स्पर्धेतील यशाच्या मार्गावर तुम्हाला बळ देतील.