रकुल प्रीत सिंगने केलं नवं फोटोशूट; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस फोटोवर चाहते फिदा
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रकुलने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत . या फोटोमध्ये कूल लुकसह ती ग्लॅमरस , बोल्ड दिसत आहे .

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंग. अभिनयापेक्षा वैयक्तिक कारणामुळे अनेकदा चर्चेत येणाऱ्या रकुलने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूट पैकी काही फोटो तिने नेटकऱ्यांसह शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत असून सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा होत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रकुलने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत . या फोटोमध्ये कूल लुकसह ती ग्लॅमरस , बोल्ड दिसत आहे . त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत . तसंच अनेकांनी तिच्या स्टाइल स्टेटमेंटला दादही दिली आहे .
रकुलने डिझायनर साडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे . या फोटोमध्ये तिने दिलेल्या पोझ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे फोटोच्या माध्यमातून चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याची रकुलची ही पहिली वेळ नाही . यापूर्वीही तिचे अनेक फोटो चर्चेत आले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रकुलचा अटॅक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रकुलने अभिनेता जॉन अब्राहमसह स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चर्चेत राहिला.