सोनी सबवरील ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ मालिकेत आपल्या आईला

Apr 13, 2023 - 18:36
 0
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ मालिकेत आपल्या आईला
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ मालिकेत आपल्या आईला

पोलिसांपासून वाचवण्यासाठी ध्रुव काय करणार?

सोनी सब वाहिनीवरील ‘ध्रुव तारा- समय सदी से परे’ एक आगळीवेगळी मालिका आहे. यात ध्रुव (इशान
धवन) आणि ताराप्रिया (रिया शर्मा) या दोन वेगवेगळ्या काळात राहणाऱ्या व्यक्तींची प्रेमकहाणी आहे.
मालिकेच्या आकर्षक कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि प्रेक्षकांना ध्रुवच्या मनात ताराविषयी
हळुवार भावना फुलू लागल्या आहेत.. असा हा रोमॅंटिक टप्पा बघताना खूप मजा येत आहे. आगामी
भागांमध्ये, कथानकाला एक रोचक वळण मिळणार आहे. या वळणावर आणखी नाट्य, रोमान्स आणि
आकर्षक दृश्ये प्रेक्षकांची वाट बघत आहेत.
सुशीला (ध्रुवची आई) ताराला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाते. तिकडे ती ताराला एक व्हिडिओ दाखवते आणि
तिने सगळ्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप तिच्यावर करते. तारा सुशीलाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की,
गुंडांशी लढताना त्या मुलीचा जीव वाचवणे इतकाच तिचा हेतू होता. पण सुशीला तिचे काहीही ऐकून वा
समजून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीये. त्यांच्यातील वादावादी विकोपाला जाते आणि रागाच्या भरात सुशीला
ताराला एका धावत्या कारसमोर ढकलून देते. सुदैवाने ध्रुव ताराच्या मदतीला येतो आणि तिला वाचवतो.
सुशीलाला आपली चूक उमगते आणि ती मान्य करते की, तारा चुकीची आहे असे तरुण (अमित पचोरी)ने
आपल्या मनात भरवले. तरुण संतापतो, कारण ताराला सक्सेना कुटुंबियांच्या जीवनातून हुसकून लावण्याचा
त्याचा डाव उधळून जातो. तो पुन्हा एक नवीन कारस्थान रचतो आणि सुशीलाला अटक करवून सक्सेना
कुटुंबियांना कठीण परिस्थितीत टाकतो.
ध्रुव आपल्या आईला पोलिसांपासून कसा वाचवणार? तो काय करण्याचे ठरवणार?
ध्रुवची भूमिका करणारा इशान धवन म्हणतो, “ध्रुव या व्यक्तिरेखेच्या जीवनात एकाच वेळी अनेक घडामोडी
होत आहेत. त्याच्या लग्नाची गोष्ट घरच्यांपासून लपवण्यापासून ते ताराविषयी मनात हळुवार भावना उत्पन्न
होण्यापर्यंत आणि आता तरुणला त्याच्या करस्थानांबद्दल फैलावर घेण्यापर्यंत. ही मालिका आता आणखी
थरारक टप्प्यात प्रवेश करत आहे आणि मला खात्री आहे की, आगामी भाग प्रेक्षकांना चक्रावून सोडतील. एक
कलाकार म्हणून मला नेहमी असे वाटते की, एकाच मालिकेत एखाद्या व्यक्तिरेखेच्या विविध छटा सादर
करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे असते. ध्रुवच्या व्यक्तिरेखेने मला एक अभिनेता म्हणून आपली क्षितिजे
विस्तारण्याची आणि माझ्या कलेबाबत प्रयोग करण्याची संधी दिली आहे.”
बघत राहा – ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ दर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी

सबवर!