नवी मुंबईत ‘अमाल्फी कोस्ट’ची झलक; इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये ‘द स्प्रिंग अफेअर’चा उत्साह!
नवी मुंबईकरांना आता युरोपमधील सुखद निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे. वाशी येथील इनऑर्बिट मॉलने आपल्या 'द स्प्रिंग अफेअर' या खास थीमद्वारे इटलीच्या प्रसिद्ध ‘अमाल्फी कोस्ट’चा नजारा मॉलमध्ये हुबेहूब साकारला आहे.
या स्प्रिंग-समर सीझनसाठी मॉलला विचारपूर्वक डिझाइन तयार करण्यात आले आहे. फोटो झोन, आकर्षक व्हीएम डिस्प्ले आणि खास ब्रँड कार्ट्समुळे मॉलमध्ये पाऊल ठेवताच पर्यटनाचा आनंद मिळतो. केवळ खरेदीच नव्हे, तर ग्राहकांना व्यस्त ठेवण्यासाठी येथे विविध इंटरअॅक्टिव्ह गेम्सचेही आयोजन करण्यात आले आहे.
मॉलमधील सजावटीत निळसर-पांढऱ्या रंगांची किनारी शैली, आकर्षक व्हिज्युअल मर्चेंडायझिंग, विशेष ब्रँड कार्ट्स आणि ‘फोटो-ऑप’ झोन यांचा समावेश आहे.
या उपक्रमांची सुरुवात १७ एप्रिलपासून पोस्टकार्ड बनविण्याच्या कार्यशाळेने झाली. प्रवासाची आठवण आणि सर्जनशीलता यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. १९ एप्रिल रोजी झालेल्या फॅशन वॉकने या उपक्रमांना वेग दिला. ओडेट, जॅक अँड जोन्स, ओन्ली, वेरो मोडा, सेलिओ, अझोर्टे आणि रेअर रॅबिट यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्सनी नवीन स्प्रिंग–समर ट्रेंड्स सादर करत मॉलला थेट ‘रनवे’चे रूप दिले.